ऑनलाईन पैसे कसे कमवायचे ?
तुम्ही जर का हा ब्लॉग वाचायला सुरुवात केली असेल तर अभिनंदन.
मी इथे तुम्हाला काही अँप्स आणि साईट्स सांगणार आहे ज्या तुम्हाला engagement, प्रसार आणि तुमच्या
इन्फ्लुएन्स च्या बदल्यात तुम्हाला काही मोबदला देतात. असं करण्या मागे ह्या व्यासायिकांचा देखील फायदा आहे, जसे की, असे बिझनेस तुमच्या नेटवर्क चा प्रसार करण्यासाठी उपयोग करतात आणि आणखीन ग्राहक (users) जोडतात, तुमचा डेटा आणि कन्टेन्ट त्यांना वापरायला मिळतो, आजच्या युगात कन्टेन्ट हा राजा आहे, आणि शिवाय सोशल मीडिया अनालिसिस व ट्रॅकिंग. लक्ष्यात घ्या,जिथे डेटा फ्री असतो तिथे तुम्ही प्रॉडक्ट असता. पण त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही.
ह्या सगळ्या ऍप्स /साईट्स वापरण्या मागे कारण असं की “some (earning) is better than nothing”. म्हणजेच जर का आपलं काम मिळकत करून देणाऱ्या साईट/ऍप्स नी होत असेल तर आपण non-paying ऍप्स का वापरा? आणखीन एक गोष्ट, गेम्स, चित्रपट असल्या तत्सम गोष्टी मध्ये वेळ, डेटा आणि बॅटरी वाया घालवण्या पेक्षा अश्या साईट्स नक्कीच चांगल्या.


पण एक गोष्ट लक्ष्यात घ्या कि अश्या अँप्स व साईट्स वर तुम्ही आपल्या उपजिविके साठी अवलंबून नाही राहू शकत आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट अशी कि तुम्हाला सातत्य पाहिजे त्या शिवाय तुम्हाला कॅशआऊट करता येणार नाही. जास्त अपेक्षा ठेऊ नका.
वेगवेगळ्या प्रकारात साईट आणि अँप यूजर्स ना मोबदला देतात, उदा.
- फॉरेन करन्सी मध्ये (युरो, US डॉलर) — ह्या साठी तुमच एक PayPal अकाउंट असणं आवश्यक आहे.
- भारतीय रुपया मध्ये — कुठलं ही एक वॉलेट, उदा. PayTM, Gpay, UPI.
- क्रिप्टो करन्सी — बिटकॉईन, लीटकॉइन (Litecoin), इथेरियम वगैरे. पण सध्या ह्या करंसीना भारतात RBI नी बंदी घातली आहे.
चला तर मग, खालील दिलेली माहिती नीट वाचा. पण हो, आधी तुमच्या कडे काही पेमेंट वॉलेट, क्रिप्टो वॉलेट आणि PayPal अकाउंट्स verified असणे गर्जेचे आहे. त्या शिवाय तुम्हाला आपली ऑनलाइन कमाई वापरता येणार नाही.
PayPal, PayTM, GooglePay तर असेलच तुमच्या मोबाइल मध्ये, जर नसेल तर आधी डाउनलोड
करा. सर्व क्रिप्टोकरन्सी साठी तुम्हाला एक क्रिप्टो वॉलेट जरुरी आहे. खालील प्रत्येक साईट/ऍप चे invite (आमंत्रण) लिंक मध्ये दिले आहे. त्यावर क्लिक करून आपण सामील होऊ शकता.
Originally published at http://gautampendharkar.blogspot.com.